Type Here to Get Search Results !

ITIऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया सुरू २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया  सुरू २०२१



राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ( Craftsman Training Scheme ) ऑगस्ट २०२१ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया ( Centralized Online Admission Process ) पध्दतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर " माहितीपुस्तिका - प्रवेश पध्दती , नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती ” दि . १५ जुलै , २०२१ पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे . राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र . संस्थांमध्ये दि . १५ जुलै , २०२१ पासुन रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे . सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा . प्रवेश पध्दती , नियमावली , प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय औ.प्र . संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्र मांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा . सदर मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी .

शैक्षणिक पात्रता :-  १० वी उत्तीर्ण  किवा अनुत्तीर्ण 

वयोमर्यादा :- किमान १४ वर्षे पूर्ण असावीत.

प्रवेश अर्ज शुल्क :- खुला वर्ग ₹१५०/- मागासवर्गीय ₹१००/- 

व्यवसाय तपशीलाची यादी आणि पत्रात ही पुढील pdf File मध्ये उपलब्ध आहे ती पाहण्यासाठी खालील PDF file var क्लिक करा.

माहिती पुस्तिका पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

प्रवेशाकरिता आवश्यक लागणारी कागदपत्राची यादी ही खालील PDF File मध्ये आहे .

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.